देशातील मध्यमवर्ग आता जोमाने 'उडणार' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढ होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमानतळांच्या सक्षमीकरणावर आणि विमान वाहतुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्यमवर्गाचा विमान प्रवास अधिक सुखद आणि सोपा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 

संबंधित बातम्या