विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

लंडन: भारतीय बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशी पळून गेलेला कुख्यात मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडन न्यायालयाने मल्ल्याची भारतात प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली असून, मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळली असल्यामुळे माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजुरी हे भारतीय तपासयंत्रणांना मिळालेले मोठे यश असून, आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

बँकांचे सुमारे नऊ हजार रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आल्यापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवर लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरू होती.

दरम्यान,  विजय मल्ल्या याने काही दिवसांपूर्वी सरकारी बँकांना ऑफर दिली होती. सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर माल्याने दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.

विजय मल्ल्यावर 16 बँकांच 9000 कोटींच कर्ज

  • स्टेट बँक ऑफ इंडिया - 1600 कोटी
  • पंजाब नॅशनल बँक - 800 कोटी
  • आईडीबीआई बँक - 800 कोटी
  • बँक ऑफ इंडिया - 650 करोड़
  • बँक ऑफ बडोदा - 550 कोटी
  • यूनाइटेड बँक ऑफ इंडिया - 430 कोटी
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी
  • यूको बँक - 320 कोटी
  • कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया - 310 कोटी
  • सेंट्रल बँक ऑफ मैसूर - 150 कोटी
  • इंडियन ओवरसीज़ बँक - 140 कोटी
  • फेडरल बँक - 90 कोटी
  • पंजाब सिंध बँक - 60 कोटी
  • एक्सिस बँक - 50 कोटी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com