वाजपेयी यांचे मुंबईत राज्य सरकारच्या वतीने उभारणार स्मारक - मुख्यमंत्री

वाजपेयी यांचे मुंबईत राज्य सरकारच्या वतीने उभारणार स्मारक - मुख्यमंत्री

मुंबई -  माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या जाण्याने हिंदुस्थानच्या राजकारणातील महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. युगांत झाला आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच वाजपेयी यांचे मुंबईत राज्य सरकारच्या वतीने एक स्मारक उभारू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील श्रद्धांजली सभेचे आयोजन नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. 

राज्यपाल नाईक म्हणाले, ""कवी मनाच्या हळव्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर राजकीय, सामाजिक जीवनात काम करण्याचा अनुभव गाठीशी आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या संस्कारामुळे घडला आहे. खऱ्या अर्थाने ते भारतीय राजकारणातील महानायक होते.'' 
मृत्यूला आव्हान देणारा माणूस अशा शब्दांत वाजपेयी यांचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ""त्यांनी आम्हाला ध्येय दाखवले. ध्येयवाद शिकवला. अशा व्यक्‍तिमत्त्वाचे मुंबई शहरात स्मारक राज्य सरकारच्या वतीने उभारले जाईल.'' 

यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे राज्यातील विविध नद्यांत सोडण्यासाठी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना वाटप करण्यात आले. 

Web Title : Vajpayee's memorial to be built by the state government in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com