वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 107 पैकी 106 जणांना वाचवण्यात यश
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 107 पैकी 106 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. भावेश गुप्ता असं या पर्यटकाचं नाव असून त्याचं वय 35 वर्ष आहे.
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 107 पैकी 106 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. भावेश गुप्ता असं या पर्यटकाचं नाव असून त्याचं वय 35 वर्ष आहे.
धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व पर्यटक इथं आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ते तिथेच अडकून पडले. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल, वसई विरार महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक गावकरी यांच्या मदतीनं मदतकार्य हाती घेण्यात आलं. यातील 26 पर्यटक डेंजर झोनमध्ये अडकले होते.त्यांची सुटका करण्यात यश आलंय. सुटका करण्यात आलेले सर्व पर्यटक सांताक्रूझ, बोरिवली, कांदिवली, मालाड, ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत.