वंचित फॅक्टरचा आघाडीला फटका; मतविभाजन युतीच्या पथ्यावर?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

आम्ही ४८ जागा जिंकू असा दावा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीत एकही जागा जिंकलेली नाही. असं असल तरी वंचित फॅक्टर युतीच्या विजयासाठी कामी आलाय अशी जोरदार चर्चा रंगतीय. तसं पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रावादीची बेगमी ही बहुजन मतांवरच राहिलीय. पण यावेळी आघाडीचे उमेदवार आणि युतीच्या उमेदवारांमधील फरक लक्षात घेता वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरला याची कल्पना येते.

बहुतांश मतदारसंघात आघाडी आणि वंचितच्या मतांची गोळाबेरीज केली तर हे पारडं युतीच्या मतांच्या तुलनेत जडच दिसेल. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतांमधली तफावत बरंच काही सांगून जाते. वंचितच्या नेत्यांना मात्र हा आरोप मान्य नाही.

निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसोबत जाण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही आंबेडकरांनी आघाडीत यावं यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. मात्र आता पराभवाचं आत्मपरिक्षण करताना वंचित फॅक्टरचा प्रभाव किती पडला हे निश्चितच तपासून पाहिलं जाईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live