धोनीच्या निवृत्तीवर विराटचं मोठं वक्तव्य...

धोनीच्या निवृत्तीवर विराटचं मोठं वक्तव्य...

मँचेस्टर : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी विचारले असता कोहली म्हणाला, आम्हाला याबद्दल अजून काही माहिती नाही. धोनीने निवृत्तीबद्दल आम्हाला काहीच कळवलेले नाही.

न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोहली म्हणाला, की चार फलंदाज लवकर आणि एकूण 6 प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर जडेजा आणि धोनीने केलेला खेळ लक्षणीय होता. जडेजाने दाखवून दिले, की तो किती मोलाचा खेळाडू आहे. त्याची आजची खेळी मी पाहिलेली त्याची सर्वोत्तम खेळी होती. कारण सामन्याचे महत्त्व आणि दडपण प्रचंड होते. संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो होतो. उपांत्य सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या 45 मिनिटांनी आमचा घात केला आहे. आम्ही खूप खराब खेळलो असे म्हणण्यापेक्षा न्युझिलंडच्या गोलंदाजांनी फारच सुरेख मारा केला असे मी म्हणेन. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजीला खूप सोपी नव्हती. त्यातून बोल्ट आणि मॅट हेन्रीने खरच खूप मस्त मारा केला. मला स्वत:ला बाद मोठ्या स्पर्धेतील फेरीत मोठ्या धावा करता आलेल्या नाहीत याची खूप निराशा आहे. 

मला वाटते जिंकल्यानंतर जास्त दंगा करता कामा नये आणि पराभवानंतर खूप खचून जाता काम नये. भारतात खेळाची संस्कृती रुजण्याकरता आपल्याला खेळाडूंना हिरो किंवा झिरो बनवले नाही पाहिजे. खेळात काहीही होऊ शकते. मोठ्या सामन्यात त्या दिवशी कसा होतो यावर सगळे अवलंबून असते हे आपण सगळ्यांनी जाणले पाहिजे. मला इतकेच सांगायचे आहे की चाहत्यांना भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने निराशा होणार. पण सर्वात जास्त दु:ख आम्हां खेळाडूंना होते हे लक्षात घ्या. झाल्या पराभवातून भारताचे तरुण खेळाडू खूप काही शिकतील आणि भविष्याकरता त्याचा फायदा होईल, असे विराटने सांगितले.
 

WebTitle : marathi news virat kohali on mahendrasingh dhonis retirement

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com