भुवनेश्वरच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद; भारताचा विजय

भुवनेश्वरच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद; भारताचा विजय

पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

भारताने सुरवातीला फलंदाजी करताना विंडीजसमोर 280 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानासमोर विंडीजचा संघ 210 धावांच करू शकला. पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर 46 षटकांत 270 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र, भुवनेश्वर कुमार 4 आणि मोहंमद शमीने 2 बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विंडीजकडून फक्त सलामीवीर इव्हीन लुईस अर्धशतकी (65 धावा) खेळी करू शकला.

त्यापूर्वी, अखेर चौथ्या क्रमांकावर कोण या प्रश्‍नाचे उत्तर विराटला त्याच्यासमोरच गवसले. मुंबईकर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारतीय डाव कोसळणार असे वाटत असतानाच कोहलीस तोलामोलाची साथ दिली, वेस्ट इंडीजने शिखर धवनला पहिल्याच षटकात पायचीत केले आणि त्यानंतर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत यांचा जम बसला असे वाटले, त्यावेळीच त्यांना बाद केले. जम बसलेल्या विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही त्यामुळे भारताची सुरवात 22.2 षटकांत 3 बाद 101 अशी झाली होती. त्याचवेळी श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीच्या सहकाऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ चार चौकार मारले होते. त्याने स्ट्राइक रोटेट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. 

अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली. त्याचवेळी जम बसल्यावर धावगतीस वेग दिला. त्यामुळे कोहली-अय्यर जोडीच्या शतकी भागीदारीत षटकामागे धावांची गती क्वचितच सहापेक्षा कमी होती. आश्‍चर्य म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी न करता हे घडत होते. विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यापेक्षा आपणच योग्य आहोत, हेच अय्यरची जणू बॅट बोलत होती. 

संक्षिप्त धावफलक 
भारत 50 षटकांत 7 बाद 279 (विराट कोहली 120 -125 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 71) विजयी वि. वेस्टइंडीज 42 षटकांत सर्वबाद 210 (इव्हीन लुईस 65, भुवनेश्वर कुमार 4-31, मोहंमद शमी 2-39, कुलदीप यादव 2.59) 

- कोहलीचे 42 वे शतक 
- कोहलीच्या विंडीजविरुद्धच्या वन-डेतील दोन हजार धावा 34 सामन्यांतच 
- कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांमध्ये गांगुलीस टाकले मागे 
- विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम. मियॉंदादला टाकले मागे 
- अय्यरचे सहा डावांतील तिसरे अर्धशतक 
 
Web Title: Virat Kohli ton and Bhuvneshwar four for give India 1-0 lead against West Indies

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com