मराठवाड्यात आजही सगळी धरणं कोरडीठाक

मराठवाड्यात आजही सगळी धरणं कोरडीठाक

महाराष्ट्रात एकीकडे मुंबई जलमय झालीय, कोकणात धरणं फुटीच्या घटना घडतायत. पण दुसरीकडे मराठवाड्यात आजही सगळी धरणं कोरडीठाक पडली आहेत. मराठवाड्यातल्या एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाही. 

मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जातेय. पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्यात. जून महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीत असतात असते, यंदा मात्र जुलै उजाडून देखील पावासानं हजेरी लावली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे.

मराठवाड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडलाय पण अद्यापही औरंगाबादसह इतर काही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच आहे.

WebTitle : marathi news water scarcity continue in marathwada as water levels of all the dams are in negative

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com