पिवळ्या साडीतील 'ती' निवडणूक अधिकारी कोण?

पिवळ्या साडीतील 'ती' निवडणूक अधिकारी कोण?

नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान उद्या (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ती महिला कोण आहे? याचीच चर्चा सर्वांत जास्त आहे.

ईव्हीएम घेऊन जाणारी महिला अधिकारी ही लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असून, त्यांचे नाव रीना द्व‍िवेदी आहे. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ही निवडणूक अधिकारी महिला द्विवेदी यांच्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले असेल, याबाबतचे पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

दरम्यान, या महिला अधिकारी यांचे फोटो जयपूर येथील असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. मात्र, हे फोटो उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काढलेले आहेत. वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी या महिला अधिकारी यांचे फोटो काढले आहेत.

Web Title: Who is the Lady Election Officer in yellow Sari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com