डॉ. प्रमोद सावंत की विश्वजित राणे ?  गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण ? 

डॉ. प्रमोद सावंत की विश्वजित राणे ?  गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण ? 

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे सभापती डॉ.प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नावाचा विचार केला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत बैठका घेऊनही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर मतैक्य होऊ शकले नाही.

उपसभापती मायकल लोबो यांनी बैठकीनंतर सांगितले, की ढवळीकर यांनी मुख्यमंत्रीपद मागितले आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले, आहे की त्यांनी भाजपसाठी अनेकवेळा त्याग केला आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली आहे. ते भाजपला मान्य झालेले नाही. भाजपला आपल्याच आमदारांपैकी एकाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला असून त्यावर सायंकाळपर्यंत तोडगा येणे अपेक्षित आहे.

गोवा फॉरवर्ड व इतर अपक्षांच्या काही अन्य छोट्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करता येण्याजोग्या आहेत, असेही लोबो यांनी सांगितले.

ढवळीकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भाजपच्या नेत्यांनी काही प्रश्न विचारले. ते गोपनीय स्वरुपाचे असल्याने सांगता येणार नाहीत. तासाभरात भाजपच्या नेत्यांनी यावर तोडगा काढू असे सांंगितले आहे.

गोव्यात भाजपच्या सरकारमध्ये मगोचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन आणि तीन अपक्षांचाही समावेश आहे. ढवळीकर यांच्या नावाला या इतर घटक पक्षांनी याआधी जाहीर विरोध केला आहे. या घडामोडींबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मात्र सकाळी 10 नंतर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे असे सांगितले. हा पेच दूर करण्यासाठी काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात आले असून ते आमदार व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

Web Title: Marathi news who will become next CM of Goa Dr Pramod Sawant or Vishwajeet Rane 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com