सेल्फीचा थरारक व्हिडिओ; सेल्फीच्या नादात 27व्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू
धोकादायक स्थितीत सेल्फी घेताना जीव गमावल्याची आणखी एक घटना घडली आहे.
इमारतीतल्या 27व्या मजल्यावर गॅलरीमध्ये कठड्याला टेकून 27 वर्षांची सँड्रा सेल्फी घेत होती. यावेळी ती तोल जाऊन खाली पडली आणि मरण पावली.पनामा सिटीमध्ये हा भयानक प्रसंग घडला.
लक्झर टॉवरमधल्या 27 व्या मजल्यावरून ही तरूणी खाली पडल्यानंतर काही वेळातच वैद्यकीय मदत पथक घटनास्थळी पोचलं पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. कारण ही तरूणी जागीच गतप्राण झाली होती.
सँड्राला दोन मुलंसुद्धा आहेत. सेल्फी घेताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिचा तोल गेला असावा आणि ती खाली पडली असावी असा अंदाज आहे.