येडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; येडियुरप्पा यांच्यासमोर येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान

येडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; येडियुरप्पा यांच्यासमोर येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान

सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे... दरम्यान, शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले. 75 वर्षांच्या येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली... एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 105 वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा भाजपा कसा गाठणार, यासाठीची जुळवाजुळव भाजपाकडून कशी केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com