बीड जिल्ह्यात दिवसाला चार आत्महत्या

बीड जिल्ह्यात दिवसाला चार आत्महत्या

बीड - विविध कारणांनी येणाऱ्या निराशातून जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज सरासरी चार आत्महत्या होत आहेत. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार २२८ आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील २८२ आत्महत्या जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत झालेल्या आहेत.

जिल्ह्यात पाच, सहा वर्षांपासून दुष्काळ वाढत चालला आहे. याचा परिणाम अर्थकारणावर होत आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. नागरिकांना छोटा-मोठा व्यापार करून कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. शिक्षणक्षेत्रात तरुणाईने उज्ज्वल यश मिळविले असले, तरी बहुतांश जणांना अपयशाचा सामना करावा लागत आहे. नैराश्‍यातून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबिला जात आहे. डॉक्‍टरांच्या मते युवकांनी व्यायाम व योगा करून, प्रत्येक दिवशी येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे शिकले पाहिजे. अपयश आल्यानंतरही त्याला खंबीरपणे तोंड दिले पाहिजे.

एकत्र कुटुंबपद्धत महत्त्वाची
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती. घरातील एखाद्या व्यक्तीस नुकसान किंवा इतर काही संकट आले तरी सर्वजण एकत्र बसून तो प्रश्न सोडवीत होते. मात्र, सध्या ‘हम दो, हमारे दो’मुळे कुणाजवळ मन मोकळे करावे अशा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून शेवटी नैराश्‍यग्रस्त व्यक्ती आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. आत्महत्यांमध्ये सर्वांत जास्त प्रमाण तरुणाईचे आहे. यासह शेतकरी, विवाहित महिला, महाविद्यालयीन युवक, युवती, व्यापारी, मजूर यांसह इतर जणांचाही समावेश आहे.

नैराश्‍य हे आत्महत्यांचे मूळ कारण आहे. उदासीनतेचे प्रमाण वाढल्याने आत्महत्यांचे विचार मनात येतात. अशा व्यक्तीने जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करावे. जास्त नैराश्‍य आले असल्यास मानसोपचारतज्ज्ञांना भेटून योग्य सल्ला घेऊन औषधोपचार करण्याची गरज आहे.
- डॉ. राजेश इंगोले, मानसोपचारतज्ज्ञ, अंबाजोगाई

Web Title: per day Four Suicide in beed district

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com