Loksabha 2019 : मनमोहनसिंग काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' : मोदी

Loksabha 2019 : मनमोहनसिंग काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' : मोदी

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' होते. त्यांना देशाची नाहीतर खुर्चीची चिंता जास्त होती. या चिंतेमुळेच देश बरबाद होत गेला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आज (रविवार) टीकास्त्र सोडले. 

मध्यप्रदेशातील सागर येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसला सत्तेची संधी मिळाली होती. तेव्हा काँग्रेसला वाटलेही नव्हते की आपल्याला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल. त्यादरम्यान सत्ता सांभाळण्याची तयारी 'राजकुमार'ची नव्हती. इतकेच नाहीतर काँग्रेसलाही त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. त्यामुळे गांधी परिवाराने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या 'वॉचमन'ला (मनमोहनसिंग) सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, 'राजकुमार'ला सर्व गोष्टी लवकर याव्यात, यासाठी सर्वच वाट पाहत होते. त्यांना त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र, हे सर्वकाही पाण्यात गेले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Web Title: Manmohan Singh is Honest Watchmen of Congress says Narendra Modi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com