कुणाला मिळणार खुर्ची, कुणाला मिळणार मिरची ?

कुणाला मिळणार खुर्ची, कुणाला मिळणार मिरची ?

भाजप आणि शिवसेनेचे सूर पुन्हा जुळल्यापासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणारंय. या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कोण वेटिंगवर राहणार या बद्दल तर्कवितर्क सुरु झालेयत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित झाला.

या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपनं दाखवलीय. शिवसेनेनं हा प्रस्ताव स्वीकारल्यास उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, संजय कुटे यांचा समावेश निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर याशिवाय, आरपीआयकडून अविनाश महातेकर यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. 


मंत्रिमंडळ विस्तार होत असताना काही मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे तर काही नेत्यांची मंत्रिपदं जाण्याचीही शक्यता आहे. यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि प्रवीण पोटे यांचं मंत्रिपद जाण्याची चर्चा आहे. तर शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच, विधानसभेला चारेक महिन्यांचा अवधी शिल्लक असताना सत्तासमीकरणाचा समतोल साधण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी साधलीय, एवढं मात्र नक्की. 
 

web title:  Who will get a chair

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com