गढूळ पाण्याचा माथेरानला “ताप’

matheran,dirty water supply , health , sanitation

माथेरान – माथेरानमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना आजारांनी ग्रासले आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास 13 सप्टेंबरला प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा क्षत्रिय मराठा समाजाने दिला आहे.

जूनपासूनच गढूळ पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी समस्येचे निराकरण करत नाहीत. विचारणा करण्यास कार्यालयात गेल्यास कोणी अधिकारी उपस्थित नसतो. जुलैमध्ये फिल्टर टाक्‍या साफ करूनही गढूळ पाणीच येत आहे. या सफाईसाठी 15 दिवस एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाजाने प्राधिकरणाच्या शाखा अधिकारी किरण शानबाग यांना दिलेल्या निवेदनात 12 तारखेपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

image_print
Total Views : 252

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड