उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी

rsz_ulhasnagar

उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड झालीय. तर उपमहापौरपदी साई पक्षाचे जीवन इदनानी विराजमान झाले आहेत. महापौर निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिवसेनेनं सभात्याग केला होता. साई पक्षाच्या गटनोंदणीवर शिवसेनेनं हरकत घेतली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हरकत फेटाळल्यामुळे शिवसेनेनं सभात्याग केला. शिवसेनेनं साई पक्षाच्या नोंदणीविरोधात थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे निवडणुकीत मोठी रंजकता निर्माण झाली होती. मात्र आता मीना आयलानी यांची निवड झाल्यानं हा ट्विस्ट आता संपलाय.

image_print
Total Views : 314

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड