प्लॅस्टिक पिशव्या बंदीमुळे डिसेंबरपासून राज्यात दुधाचा तुटवडा

प्लॅस्टिक पिशव्या बंदीमुळे डिसेंबरपासून राज्यात दुधाचा तुटवडा

मुंबई - दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास महिन्याच्या अखेरपासून राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकट्या मुंबईत 70 लाख लिटर दुधासाठी एक कोटीहून अधिक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (ता. 11) दूध उत्पादकांची बैठक होणार आहे. 

राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर उत्पादकांनी दूध कंपन्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा 15 डिसेंबरपासून थांबवण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र आणि दमण येथील प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुरवठादारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पुरवठा थांबवला, तरी दूध कंपन्यांकडे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुरेल एवढा प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आहे. त्यानंतर मात्र प्लॅस्टिक पिशव्यांचा तुटवडा भासू लागेल, असे दूध कंपन्यांकडून सांगण्यात आले. 

राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांवर पुनर्प्रक्रिया करण्याची जबाबदारी दूध कंपन्यांवर सोपवली आहे. हा पर्याय वाटतो तेवढा सोपा नाही. त्यामुळे सरकारने योग्य पर्याय द्यावा, अशी भूमिका दूध कंपन्यांनी मांडली. सरकारने या मुद्द्यावर तातडीने योग्य तोडगा काढावा, असे महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 200 हून अधिक दूध उत्पादकांची संघटना असलेल्या दूध उत्पादक महासंघाची मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

Web Title: milk shortage from December end

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com