इंग्रजी पाट्यांच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक

mns marathi patya

दुकानवरील इंग्रजी पाट्यांच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीय. मनसेने मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतलाय. कल्याण शिवाजी चौक परिसरात येत्या काही दिवसात अनेक दुकान झाली आहेत. या दुकानांवर इंग्रजीत पाट्या आहेत. नेमका हाच मुद्दा कल्याण शहर मनसेने हाती घेत ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या होत्या त्यांना काळे फासत आपला निषेध व्यक्त केला. शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक परिसरात असणाऱ्या विविध दुकानांच्या पाट्यांना काळं फासत 2 दिवसाचं अलटिमेटम दिलं आहे. मात्र यावेळी काही दुकानांवर इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या असतानाही त्यांना काळं फासल्याचं दिसून आलं.

image_print
Total Views : 678

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड