'एक खोटारडा अर्थसंकल्प वाचत होता आणि दुसरा वाजवत होता'

'एक खोटारडा अर्थसंकल्प वाचत होता आणि दुसरा वाजवत होता'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी बोचरी टीका करत अर्थमंत्री पियूष गोयल आणि मोदींनी खोटारडे म्हटले आहे.

एक खोटारडा अर्थ संकल्प वाचत होता आणि दुसरा खोटारडा जोर जोरात बेंच वाजवत होता

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 1, 2019

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज संसदेत या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडणार हे यापूर्वीच वर्तविण्यात आले होते. त्यानुसार पियुष गोयल यांनी विविध क्षेत्रात घोषणांचा पाऊस पाडला. महागाईचा दर नियंत्रित केल्याचा दावा करत त्यांनी सरकारने गेल्या पाच वर्षांत जोरदार विकास केल्याचे सांगितले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत केल्याचे सांगत पुढील काही वर्षांत अर्थव्यवस्था पाच लाख कोटींचा आकडा गाठेल असे गोयल यांनी सांगितले. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की एक खोटारडा अर्थसंकल्प वाचत होता आणि दुसरा खोटारडा जोरजोरात बेंच वाजवत होता. मनसेकडून अद्याप या अर्थसंकल्पावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande criticize Narendra Modi Government on Budget 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com