राज ठाकरेंचा आज ‘संताप’ मोर्चा

Raj Thackeray, MNS, Elphinstone tragedy, Metro cinema, churchgate,MNS rally

मुंबईतल्या एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्य सरकारविरोधात संताप मोर्चा काढणार आहेत. मेट्रो जंक्शनपासून सुरु होणारा हा मोर्चा चर्चगेट स्थानकावर धडक देईल. राज ठाकरेंचा हा संताप मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरु होणार आहे.मोर्चात सहभागी व्हा हे आवाहन करण्यासाठी मनसेने सोशल मीडियाचा आधार घेतलाय. हा मोर्चा माझा किंवा माझ्या पक्षाचा नाही तर तो आपला आहे असं राज यांनी सोशल मीडियावर म्हटलंय. हा मोर्चा केवळ रेल्वे प्रशासनाविरोधात नाहीय.सध्या देशात सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे अशी भूमिका मनसेने घेतलीय.मनसेच्या या मोर्चाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो यावर मनसेची पुढची वाटचाल अवलंबून असल्याने राज ठाकरेंसाठी हा मोर्चा महत्वाचा मानला जातोय.

image_print
Total Views : 1042

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड