अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अग्रभागी ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट -गोयल

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अग्रभागी ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट -गोयल

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मंडळाला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अग्रभागी ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

गोयल म्हणाले, ''शेतकरी वर्गाचा विकास व्हावा, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी बियाणांपासून ते बाजारापर्यंत निर्णय घेतले जात आहेत. उत्पादन क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनण्याच्या या कालखंडामध्ये संपूर्ण पर्यावरण यंत्रणा शेतकरी वर्गाच्या हितकारक बनवण्याचे काम करण्यात येत आहे.''

''शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आंतर-मंत्रालय समिती बनवण्यात आली आहे. नीती आयोग तसेच  अनेक संशोधक, शेतकरी, कृषी क्षेत्रामध्ये असणारे भागिदार घटक यांच्याबरोबर अतिशय सखोल चर्चा, विचार-विनिमय करून सरकारने एक दिशा निश्चित केली आहे. आणि त्या मार्गावरून वाटचाल सुरू आहे'', असेही ते म्हणाले.

शिवाय 2020 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा  गोयल यांनी केली आहे. 

Web Title: Modi Government to double income of farmers, says Piyush Goyal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com