अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंगाचा प्रयत्न

mumbai,actress,priya berde,molested

मुंबई : मराठीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा शनिवारी एका मॉलमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया बेर्डे मीरा रोडवरील एका मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या असताना दारु प्यायलेला माणूस त्यांच्याकडे पाहत होता. नंतर तो बाहेर उठून गेला आणि थेट शेजारी येऊन बसला. त्यानंतर तो अश्लिल चाळे करू लागला. त्यामुळे त्यांनी त्याला तेथेच धडा शिकवत श्रीमुखात लगावली आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

”सार्वजनिक ठिकाणी होणारे असे प्रकार थांबायलाच हवे. महिलांनीही न घाबरता अशा प्रकाराविरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी. आज माझ्यावर प्रसंग आला, तो कोणावरही येऊ शकतो. पण, अशा मोकाट मनोवृत्तीला आळा बसायला हवा”, असे प्रिया बेर्डे यांनी ‘ई सकाळ’शी बोलताना सांगितले.

image_print
Total Views : 491

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड