रिक्षा चालकांची NMMTच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला बेदम मारहाण

res ghansoli

नवी मुंबईतील घणसोलीमध्ये तीन रिक्षा चालकांनी एनएमएमटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर 5 मध्ये हावरे चौकात हा प्रकार घडला आहे. रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या असल्याने बस जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरने हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, यानंतर रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जत घालायला सुरवात केली. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवत शिवीगाळ केली. दोन रिक्षा चालकांनी तर बस ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. मारहाण करणारे रिक्षाचालक हे घणसोलीचे आहेत.

image_print
Total Views : 810

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड