बदलीसाठी राजकीय शिफारस करणं पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

बदलीसाठी राजकीय शिफारस करणं पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. शिफारसी आणणाऱ्या 42 पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत गृह विभागाने दिले आहेत. राज्यातील पोलिस निरीक्षकांनी अनेक आमदार, मंत्री तसंच इतर राजकीय नेत्यांचं शिफारसपत्र बदलीसाठी जोडली होती. या संदर्भातील लेखी खुलासा आता घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पोलिसांना बदलीचं शिफारसपत्र देणाऱ्यांमध्ये मंत्री विनोद तावडे, गिरीष बापट, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांची नावं आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग