पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी जेलची हवा खाणाऱ्यांचा आकडा बारावर
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून जेलची हवा खाणाऱ्यांचा आकडा बारावर पोहोचला आहे. पीएनबीचा जनरल मॅनेजर राजेश जिंदरला सीबीआयने अटक केली आहे. त्याआधी मुकेश अंबानींचे नातेवाईक आणि फायरस्टार इंटरनॅशनल डायमंड्स ग्रुपचा अध्यक्ष विपुल अंबानीसह पाच जणांवर सीबीआयने कारवाई केली होती. दरम्यान पीएनबी घोटाळ्याचे पडसाद बाजारातही दिसू लागले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या समभागामध्ये निरंतर घसरण सुरूच आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून जेलची हवा खाणाऱ्यांचा आकडा बारावर पोहोचला आहे. पीएनबीचा जनरल मॅनेजर राजेश जिंदरला सीबीआयने अटक केली आहे. त्याआधी मुकेश अंबानींचे नातेवाईक आणि फायरस्टार इंटरनॅशनल डायमंड्स ग्रुपचा अध्यक्ष विपुल अंबानीसह पाच जणांवर सीबीआयने कारवाई केली होती. दरम्यान पीएनबी घोटाळ्याचे पडसाद बाजारातही दिसू लागले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या समभागामध्ये निरंतर घसरण सुरूच आहे. भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील आजवरचा सर्वात मोठय़ा घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जागतिक मानांकन संस्थांनी बँकेच्या पतमानांकनाबाबत गंभीर फेरविचाराचा इशारा दिला आहे.