येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुणे-नाशकातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यांचा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांतही उष्णता वाढण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी आहे.

वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुणे-नाशकातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यांचा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांतही उष्णता वाढण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी आहे. मात्र येत्या काही दिवसांत पूर्वेकडून उष्ण वारे वाहणार असल्याने तापमानात वाढ होणार आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live