मानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

मानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे. इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. नवीन संशोधनानुसार, हा अवयव म्हणजे द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचं जाळं आहे. हे जाळं आकुंचित पावू शकतं किंवा प्रसारित होतं. त्यामुळे शॉक ऍब्झॉर्बरप्रमाणे काम करतं.

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live