राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा  सक्रिय आहे.

विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा  सक्रिय आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास पोषक हवामान होत आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live