निवडणुका आल्यात.. भाजपकडून मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू?
आगामी लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपनं आता मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न सुरू केलेत. एनडीएत योग्य सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी, शिवसेनेला मोठी ऑफर देण्यात आल्याचे सुत्रांकडून समजतंय. ही ऑफर म्हणजे राज्यसभेत उपसभापतीपद देण्याबाबत चर्चा सुरु आहे. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी.जे.कुरियन काही महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. गेल्या 41 वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे.
आगामी लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपनं आता मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न सुरू केलेत. एनडीएत योग्य सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी, शिवसेनेला मोठी ऑफर देण्यात आल्याचे सुत्रांकडून समजतंय. ही ऑफर म्हणजे राज्यसभेत उपसभापतीपद देण्याबाबत चर्चा सुरु आहे. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी.जे.कुरियन काही महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. गेल्या 41 वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे. मात्र, यावेळी मोदी सरकार हे पद प्रमुख विरोधी पक्षांकडे जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत.