'शुटिंग स्टार' तेजस्विनी सावंतची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात गोल्डन कामगिरी
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी केली. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं. तेजस्विनीने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली. तेजस्विनीने 457.9 गुणांची कमाई करत नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. दरम्यान, कालच तेजस्विनी सावंतनं महिलांच्या 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत 618.9 गुणांची नोंद करून भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर तेजस्विनीने आज त्यापुढे मजल मारत सोनं टिपलं.