पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात. ब्रोकरेज कंपन्यांच्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीआधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी  प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात. ब्रोकरेज कंपन्यांच्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीआधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी  प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक संपल्यानंतर आतापर्यंत लीटरमागे पेट्रोल 91 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये 1 रुपये 8 पैशांची वाढ झाली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live