पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील - एकनाथ शिंदे
मुंबई - पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची आज पाच वाजता पत्रकार परिषद आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील असे मत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा पराभव करुन राजेंद्र गवित विजयी झाले. त्या पार्श्वभूमीवर युतीतील तणाव हा टोकाला गेला आहे. भाजपने या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या सगळ्यांचा ही निवडणुक जिंकण्यासाठी वापर केला आहे, असे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
पालघर निवडणुकीनंतर मात्र, युती तुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.