'त्या' विद्यार्थांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा
12 वी नंतर अभियांत्रिकी,मेडिकल,आर्किटेक्चर,बी फार्मला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातपडताळणी संदर्भात राज्य सरकारनं दिलासा दिलाय. जातपडताळणीचे दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
विद्यार्थी वर्गामध्ये जातपडताळणी संदर्भात चिंतेच वातावरण होतं. त्या संदर्भांत मंत्रीमंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार समाजकल्याण विभागाच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करण्यात आलीय. याआधी जातपडताळणीचे दाखले सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदत होती. ती आता 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे.