आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर 10 दिवसांची वेतन कपात
वेतनकरारावरून 8 आणि 9 जून असे दोन दिवस आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एक दिवस गैरहजर असल्यास नऊ आणि दोन दिवस गैरहजर राहिल्यास 10 दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे.
एसटी महामंडळामध्ये एक लाख सहा हजार कर्मचारी असून, आंदोलनावेळी त्यातील 37 हजार कर्मचारी कामावर हजर होते. एसटी महामंडळाच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांचे 'ना काम, ना दाम' या तत्त्वानुसार वेतन कापले जाईल.

एक आणि दोन दिवसांच्या गैरहजेरीची रक्कम जुलै आणि उरलेल्या आठ दिवसांची कपात ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यास एक दिवसाप्रमाणे केली जाणार आहे. हा निर्णय अंमलात आल्यास संपकरी कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.