रिक्षावरून काढली अंत्ययात्रा
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. चक्क रिक्षाला धक्का मारत अंत्ययात्रा काढल्याचं या व्हिडीओत दिसतंय. हा व्हिडीओ नालासोपाऱ्यातील असल्याचा दावा केल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरंच ही अंत्ययात्री होती, कोणतं आंदोलन होतं. आता बरेचजण वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. हटके केल्यावर सोशल मीडियावरून लगेच प्रसिद्धीही मिळते. त्यामुळं याचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

वसई विरारमध्ये पावसानं कहर माजवला होता...त्यावेळी अत्यावश्यक सेवाही पुरविणं कठीण झालं होतं. अशा पावसातून प्रेत नेणं शक्य नसल्यानं पावसामध्ये चक्क रिक्षावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. या व्हिडीओनं प्रशासनाच्या नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे उडविले.
याच ठिकाणी पाणी भरल्यानं अंत्ययात्रा नेताना रिक्षाही बंद पडली. त्यामुळं रिक्षाला धक्का मारत पार्थिव स्मशानात नेलं. नालासोपाऱ्याच्या समर्थनगरात राहणाऱ्या राजकुमार जयस्वाल यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. राजकुमार हे मुंबईत सेल्समनचे काम करायचे. घटनेच्या दिवशी खूप पाऊस पडत होता. परिसर पाण्याखाली गेला होता. पण, घरात भाजीपाला नसल्यानं तो आणण्यासाठी राजकुमार मार्केटमध्ये गेले होते. पण महावितरणची विजेची तार उघडी असल्यानं त्यांना विजेचा करंट लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाऊस जास्त असल्यानं मृतदेह नेण्यासाठी वाहन मिळत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांनी नाइलाजास्तव रिक्षाच्या टपावरून मृतदेह स्मशानात नेला.