खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण... गिरीश महाजनांचा सणसणीत टोला
जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील सख्य सर्वश्रूत आहे. भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये वरवर पाहता सगळं आलबेल वाटत असलं तरी दोघांमधील छुपं राजकीय युद्ध लपलेलं नाही.
जळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ते पुन्हा एकदा समोर आलंय. खडसे साहेब जेष्ठ आहेत त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण पक्षाला तस वाटायला पाहिजे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय.
काही दिवसांपूर्वीच जेष्ठत्वानुसार मी मुख्यमंत्री व्हयला हवं होतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.