वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नाहीत; सनातनच्या प्रवक्त्यांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नालासोपारा इथल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे..

सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करून अटक आरोपींबाबत आपले हात झटकले आहेत. मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा हेतू होता, हा आरोपही सनातनने फेटाळला आहे.. नालासोपाऱ्यात आढळलेली स्फोटकं, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींच्या अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live