आज पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 47 पैशांनी पुन्हा वाढले; पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग चौदाव्या दिवशीही कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग चौदाव्या दिवशीही कायम आहे. आज पेट्रोलचा दर 38 पैसे तर डिझेलचा दर 47 पैशांनी पुन्हा वाढले. मुंबईत पेट्रोल 87 रुपये 77 पैसे, तर डिझेल 76 रुपये 98 पैशांवर पोहोचलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिणामही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकिकडे इंधन दराची झेप घेणं सुरु असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत द्यायला सरकारनं स्पष्ट नकार दिलाय.

Web Title: marathi news petrol price hike continues on day fourteen 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग