दाजीपूर अभयारण्य स्वच्छतेसाठी सरसावले हात

दाजीपूर अभयारण्य स्वच्छतेसाठी सरसावले हात

राशिवडे बुद्रुक - सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या दाजीपूर अभयारण्य व राधानगरीच्या स्वच्छतेचा मंत्र घेऊन इथे येणाऱ्यांना शिस्त लागली आहे, तरीही क्वचित प्रसंगी होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लबच्या शिलेदारांनी हा वसा पुढे सुरू ठेवला आहे.

अभयारण्याच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या परिसरात जायचे आणि तिथे साचलेला मानवनिर्मित कचरा हटवायचा हा संकल्प केला आहे. दोन महिन्यांत त्यांनी दोन देवराया स्वच्छ केल्या आहेत. पुढे प्रमुख स्थळांवर लक्ष केंद्रित होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा ऑिक्‍सजन पार्क म्हणून पश्‍चिम घाटाकडे पाहिले जाते. विशेषतः राधानगरी अभयारण्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. याच्या कुशीत जिल्ह्याची तहान भागविणारे राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी हे तीन मोठे जलाशय आहेत. राधानगरी जलाशयाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या परिसरात गेल्या काही वर्षात पर्यटकांची मोठी वर्दळ सुरु झाल्याने येथे प्लािस्टकसह काचा व अन्य मानवनििर्मत कचरा साचू लागला. याची दखल घेऊन ‘सकाळ’ च्या पुढाकाराने व वन्यजिव, बायसन नेचर क्‍लब, स्थानिकांसह निसर्गप्रेमींच्या सहभागातून निपटारा करण्यात आला. तरीही प्रतिवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून काहीअंशी कचरा होतो. खरेतर अभयारण्य कक्षेत येणाऱ्या या ठिकाणांवर कचरा होणारच नाही याकडे वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज असताना तितकेसे गांभीर्य दिसत नाही.

आता ‘वेळोवेळी करणार स्वच्छता’ ही शपथ घेऊन येथील नैसर्गीक ठेवा जपण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लब उतरले आहे. आजवर त्यांनी वाकी घोलातील वाकोबाची व हसणे येथील गांगोलींगेश्‍वराची देवराई स्वच्छ केल्या आहेत. यासाठी स्वतःच्या वाहनातून हा कचरा बाहेर काढून विल्हेवाट लावली जाते. यामध्ये स्थानिकांना घेऊन जागृतीही केली आणि कचरा होणार नाही याची दक्षता घेण्याचे अवाहनही ते करतात. राधानगरी नेचर क्‍लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, सुखदेव पाटील, संदेश म्हापसेकर, अभिषेक निल्ले, मयुरेश सावंत, प्रसाद इंगवले, गणेश डब्बे, शशांक लिंग्रस, अनिल चव्हाण, मारुती मोरे, साईराज पताडे, रुपेश सावंत, नागराज चाळके, अमोल सुतार, अंजीर पार्टे, विठोबा पाटील यांचा सहभाग असतो.

    अनेक पिढ्यांनी देवांची राई म्हणून राखीव ठेवलेले जंगलटापू हा समृद्ध वनौषधींनी नटलेले आहेत. भविष्यात आयुर्वेदिक संशोधनासाठी त्यांचा फायदा होणार आहे. याचे भान ठेवून आम्ही आधी देवरायांना नैसर्गिक ठेवा जतन करण्याची जागृती करत आहोत. ‘सकाळ’च्या अभयारण्य स्वच्छता मोहिमेतून आम्ही प्रेरणा घेतली. पुढे अभयारण्याच्या मुख्य ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करणार आहोत. एक जानेवारीचे औचित्य साधून आम्ही उगवाई मंदिर परिसर स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षाची ही भेट असेल.
    - फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, राधानगरी नेचर क्‍लब

Web Title: Kolhapur News Cleanliness of the Dajipur Sanctuary
टॅग्स
अभयारण्य राधानगरी कोल्हापूर राधानगरी अभयारण्य पर्यटक पुढाकार वन्यजीव अनिल चव्हाण अंजीर आयुर्वेद
Advertisement
संबंधित बातम्या
murder
चिंचवडमध्ये अनोळखी व्यक्तीचा खून
पिंपरी-चिंचवड : चिंचवडमधील स्टेशन परिसरात आज(शुक्रवार) सकाळी पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. सकाळी ११.०० वाजता एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला...
बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी
तळेगाव दिघे (नगर) - संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले. काल (गुरुवार) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना...
केंचे यांनी जागवल्या शशी कपूर यांच्या आठवणी
सांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजघराण्यात जन्माला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com