दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा विचार नाही

rsz_2000 notes

नवी दिल्ली: दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून अशा अफवा हेतूपुरस्सर पसरविल्या जात असल्याचे केंद्र सरकारने आज (बुधवार) स्पष्ट केले.

नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या मुद्यावर राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजीजू म्हणाले की, “नोटाबंदीनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मात्र, सध्या दोन हजारांच्या नोटांबद्दल ज्या काही अफवा पसरविल्या जात आहेत, त्याबद्दल चिंता वाटत आहे. अशा कोणत्याही अफवांच्या आधारे सरकार निर्णय घेत नसते. सरकारचा दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा कोणताही विचार नाही.’

NEWS SOURCE : सकाळ

image_print
Total Views : 291

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड