OHE टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मध्यरात्री 12.30 च्या सुमारास ओव्हरहेड वायरची देखभाल करणारी व्हॅन, कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळावरुन घसरली. त्यामुळे, मध्य रेल्वेवरील कसारा ते टिटवाला स्थानकादरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

सकाळी कामासाठी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना, या खोळंब्याचा सर्वाधिक फटका बसला. एकही लोकल न सुटल्याने, कसारा आणि वासिंद स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.. आणि रुळावर उतरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा फटका लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना बसला असून, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक मेल एक्स्प्रेस इगतपूरी आणि नाशिक स्थानकावर रोकण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live