'आम्ही तयार होतो, पण काळोख होता म्हणून गप्प बसलो'

'आम्ही तयार होतो, पण काळोख होता म्हणून गप्प बसलो'

नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्यावेळी अंधार होता. रात्रीचा अंधार असल्यामुळे आमचे हवाई दल वाट पाहात बसले होते, असे मजेशीर उत्तर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने दिले आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी (ता. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आपापल्या पद्धतीने उत्तरे देण्यास सुरवात केली. पाकिस्तानच्या संसदेमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेज खटक यांनी तर अतिशय मजेशीर विधान केले आहे. ते म्हणाले, 'भारतीय वायू सेनेने हल्ला केला तेव्हा आम्हीही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होतो. पण, रात्रीचा काळोख होता, म्हणून आम्हाला गप्प बसावे लागले.'

परवेज खटक यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. परवेज खटक यांनी हसू आणणारे स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार नायला इनायत यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, परवेज खटक यांनी हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. तसेच, आम्ही भारताला प्रत्युत्तर देणार होतो, पण काळोख होता, त्यामुळे आम्हाला झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही, असं मजेशीर उत्तर खटक यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, यापुढे भारताने अशी कारवाई केल्यास आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही खटक यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. बिथरलेल्या पाकिस्तानला काय बोलावे हे सुद्धा कळेनासे झाले आहे.

Web Title:Our Force was waiting for the night because it was dark says Pakistans defense minister on air strike

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com