जे आधीच्या सरकारला जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान मोदी

जे आधीच्या सरकारला  जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान मोदी

कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सांगितले.

येथे एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी ते बोलते होते. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी, रामदास आठवले, स्थानिक खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार नरेंद्र पवार, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्र ही आशा अपेक्षाची भूमी आहे. सर्वांची स्पप्ने पूर्ण करणारी भूमी आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीवर आहे. येथे जन्म घेणाऱ्यांचे हृदय विशाल आहे. संपूर्ण भारताचा चेहरा येथूनच दिसत आहे. मागील चार-साडेचार वर्षांत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई आर्थिक घडामोडींचे केंद्र बनत आहे. याचा आणखी विकास होणार आहे. मुंबईतील लोकल, जुन्या मार्गाचा डागडुजी केली जात आहे. 2006 मध्ये मेट्रो प्रस्तावित होती. मात्र, तो प्रकल्प मार्गी लावण्यात खूप उशीर करण्यात आला. या आठ वर्षांत फक्त 11 किमी मार्ग करण्यात आला. येत्या काही दिवसांत 35 किमीचा रस्ता जोडला जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरा करेल तेव्हा प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे यासाठी 90 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. आमचे संस्कार, वेग यापूर्वीच्या सरकारपेक्षा वेगळा आहे. यापूर्वीच्या सरकारने साडेपंचवीस लाख घरे बांधली. मात्र, आमच्या सरकारने एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. बेघर लोकांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ही 'आदर्श' सोसायटी नाही. पण खरीच आदर्श अशी सोसायटी असेल.

दरम्यान, देशातील जनतेचे वीजबिल कमी व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1.25 कोटी बल्ब महाराष्ट्रात वाटण्यात आले. केंद्र सरकार 'सबका साथ सबका विकास'वर काम करत आहे. देशभरातील महिलांना मान-सन्मान मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तसेच तरुण, मध्यमवर्गीयांसाठीही मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: Our Government done more than  before goverment  says Prime Minister Narendra Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com