मागील 25 वर्षांपासून ‘तो’ खातोय झाडपाला

lahore,pakistan, punjab, mehmud butt

लाहोर : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात. सर्वसाधारणपणे मानवी जीवनाचे चक्र याभोवतीच फिरत असते. प्रत्येकाला पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नरूपी इंधनाची नितांत आवश्‍यकता असते.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये मात्र या सर्व गोष्टींना अपवाद ठरू शकेल असा माणूस आढळून आला आहे. हा माणूस चक्क झाडाची पानं आणि ओली लाकडं खाऊन मागील 25 वर्षांपासून जिवंत आहे. विशेष म्हणजे या काळात तो एकदाही आजारी पडलेला नाही. मेहमूद बट (वय 50) असे त्याचे नाव आहे.

घरामध्ये अठराविसे दारिद्य्र असल्याने बट यांना मूलभूत गरजांची पूर्तता करणे शक्‍य होत नव्हते. अन्न विकत घेणे परवडत नसल्याने आपण झाडपाला खायला सुरवात केली. भीक मागून पोट भरण्यापेक्षा झाडपाला खाणे आपण पसंत केल्याचे त्यांनी ‘दि न्यूज इंटरनॅशनल’शी बोलताना सांगितले. पुढे हाताला काम मिळाल्यानंतर बट यांनी अन्न खायला सुरवात केली; पण अनेक दिवसांपासून जेवणाची सवयच राहिली नसल्याने त्यांना पुन्हा नाइलाजाने झाडपाल्याकडे वळावे लागले.

आता ते वड, ताडी या झाडांची पाने खाऊन गुजराण करत आहेत. बट सध्या गाढवाच्या गाडीच्या माध्यमातून वाहतुकीचा व्यवसाय करतात. या बदल्यात त्यांना सहाशे रुपये प्रतिदिन एवढा मोबदला मिळतो. आता हातात मुबलक पैसे येऊनदेखील बट खाद्यपदार्थ घेणे टाळतात, पारंपरिक अन्नापेक्षा झाडपाल्याची चव काहीशी वेगळीच असते, असे त्यांनी सांगितले.

image_print
Total Views : 1636

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड