'मोदी हे 21व्या शतकातील आंबेडकर'- त्रिवेंद्रसिंह रावत

'मोदी हे 21व्या शतकातील आंबेडकर'- त्रिवेंद्रसिंह रावत

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 21व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे खळबळजनक विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज केले. 

"गरीब पालकांच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदी यांनी समाजाच्या सर्व स्थरांतील गरिबांचा विचार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदी हे 21व्या शतकातील आंबेडकर आहेत,'' असे वक्तव्य रावत यांनी केले.

केंद्राच्या ताज्या निर्णयासंदर्भात पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले, मोदी यांचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडून बऱ्याच काळापासून केली जात होती. केंद्राच्या निर्णयाचा या घटकांना फायदा होईल. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आपली मतपेढी कायम ठेवण्यासाठी सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून नुकतीच करण्यात आली आहे. 

Web Title: PM Modi is Ambedkar Of 21st Century says Uttarakhand Chief Minister

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com