पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना?

पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना?

​पुणे : काँग्रेसकडून पुण्याच्या जागेवर अजूनही चर्चाच सुरु असताना, प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे.

महाराष्ट्रातील जागावाटपात झालेल्या प्रचंड गोंधळानंतर पुणे या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात सगळे व्यवस्थित व्हावे यासाठी श्रेष्ठी सावध पावले टाकत आहेत. भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी द्यावी का? यावर विचार सुरु आहे. मोहन जोशी, अरविंद शिंदे यांचेही नाव चर्चेत आहेच. 

पुण्यातील मतदारसंघात योग्य उमेदवार द्यावा यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी बैठक घेतली होती. अन्य एखादे नावही समोर येण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पाटील यांनी राष्ट्रवादीला मदत करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. पुण्यात पुन्हा एकदा मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Pravin Gaikwad likely to contest from Congress in Pune Loksabha constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com