राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु

Meira Kumar, Ramnath Kovind,India's 14th President,India, #PresidentialElections2017,New Delhi, #Votecounting

राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झालीय. मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी संसदेत मतदान केलं.त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री आणि खासदारांनीही मतदान केलंय.
मुंबईतही मतदानाला सुरुवात झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम हे देखील आज मतदान करणार आहेत. त्यांना कोर्टानं मतदानाची परवानगी दिलीय.
एनडीएतर्फे रामनाथ कोविंद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी मैदानात आहेत. एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातोय. तसेच देशातील विधानसभांमध्ये मतदानालाही सुरूवात झालीय. लोकसभा , राज्यसभा, विविध राज्य विधिमंडळ मिळून एकूण ५ लाख २७ हजार ३७१ मतं एनडीए कडे आहेत.याव्यतिरिक्त छोट्या छोट्या विरोधी पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दिलाय.20 जुलैला राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणारेय.तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला पदभार स्वीकारतील.

image_print
Total Views : 224

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड