“भारतात अनेक हार्वे वेन्स्टाइन” – प्रियांका चोप्रा

rsz_priyanka-chopra

नुकताच अभिनेत्री प्रियांका चोप्राला भारतातही हार्वे वेन्स्टाइन आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता.. या प्रश्नच उत्तर देताना भारतात फक्त एकचं हार्वे वेन्स्टाइन नसून अनेक असल्याचं प्रियंका चोप्राने सांगून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवलीये.

हार्वेने फक्त हॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच लक्ष्य केले नाही तर त्याची वाईट नजर ऐश्वर्या रायवरही होती. त्याला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक सिमोन शेफील्डने याबाबत खुलासा देताना म्हणाली की, ”प्राइड अॅण्ड प्रिज्युडाइस’ या सिनेमाबाबत चर्चा करण्यासाठी हार्वेला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. तिला एकटं भेटण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्नही त्याने मला विचारला. पण मी त्याला असे होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर ऐश्वर्या आणि हार्वे यांच्यात अनेक भेटी झाल्या. त्या प्रत्येक भेटीत तो तिला एकांतात भेटण्याचे शर्तीचे प्रयत्न करायचा. अनेकदा त्याने मला दुसऱ्या मिटींगना जाण्यास सांगितले. पण मी कधीही गेले नाही. शिवाय एकदा त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना त्याने मला बाजूला बोलावून विचारले की, ‘ऐश्वर्यापासून दूर राहण्याचे काय घेशील?’ त्याने मला भविष्यात काम मिळू न देण्याचीही धमकी दिली. पण मी कधीच ऐश्वर्याला त्याच्यासोबत एकटे सोडले नाही.’

image_print
Total Views : 2055

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड