पुण्यात पोलिस कोठडीत आरोपीने केला अात्महत्येचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच्या धारदार तुकडयाद्वारे हात व छातीवर वार आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजता बंडगार्डन पोलिस ठाण्यात घडली.

करणसिंह रजपुतसिंह दुधानी (रा.अंधशालेमागे, रामटेकडी) असे आरोपीचे नाव आहे. दुधाणीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीच्या गुंहयात अटक करुन सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर पोलिस कोठडी मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते.

दरम्यान, त्याने सोमवारी सकाळी हा प्रकार केला. त्यानंतर त्यास उपचारासाठी ससुन रुग्णलयात हलविण्यात आले. उपचार केल्यानंतर दुपारी पुन्हा कोठडीमध्ये आणण्यात आले. पोलिस हवालदार फिरोज शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: In Pune, the accused attempted suicide in police custody

संबंधित बातम्या

Saam TV Live